Translate

कांदा अनुदान ३५० रु. Kanda Anudan 350 Rs.

 कांदा अनुदान ३५० रु.


Kanda Anudan 350 Rs.
Kanda Anudan 350 Rs.कांदा अनुदान ३५० रु. Kanda Anudan 350 Rs.  २७ मार्च २०२३ महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या शासन निर्यण नुसार कांदा उत्पादक शेतकरी यांना प्रति क्विंटल ३५० रुपये या दराने अनुदान मिळणे बाबत जाहीर झाला आहे. 

या निर्यण नुसार पात्र शेतकरी कोणते आणि तसेच त्या साठी अटी आणि शर्ती  काय आहेत त्याची संपूर्ण माहिती या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. आवडल्यास नक्की शेअर करा. 'कांदा अनुदान ३५० रु. Kanda Anudan 350 Rs.'


सध्या कांदा बाजारभाव मध्ये होत असलेली सततची  घसरण आणि शेतकरी संघटना याच्याकडून होणारी अनुदानाची  मागणी याच्या आधारे महाराष्ट्र शासनाने या परिस्थितीचा आढावा घेऊन शासन निर्णय जाहीर करून अनुदान पात्र शेतकरी यांना ३५० रु. प्रति क्विंटल देण्यात येणार असे ठरवले आहे.
 

आता या अनुदानासाठी अट आहे तर दिनांक १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधी मध्ये ज्या शेतकऱ्यानी राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समिति मध्ये, पणन अनुज्ञप्तीधारकाकडे तसेच खाजगी बाजार समित्यांमध्ये किंवा नाफेड कडे खरीप हंगाम मधील लाल कांदा विक्री केला असेल अश्या शेतकऱ्याना प्रति क्विंटल ३५० रु. अनुदान मिळणार आहे. 'कांदा अनुदान ३५० रु. Kanda Anudan 350 Rs.'अटी आणि शर्ती - 


१. २०० क्विंटल पेक्षा जास्त अनुदान मिळणार नाही असे या शासन निर्णय मध्ये दिलेले आहे. 
 
२. १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या खरीप हंगाम मध्ये विकलेला लाल कांदा साठी अनुदान दिले जाणार आहे. 

३. मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती वगळता महाराष्ट्र राज्यातील इतर सर्व बाजार समितीचा या योजनेस समावेश केलेला आहे. 

४. बाहेरील राज्यातून आवक केलेल्या व त्या व्यापऱ्यांसाठी ही अनुदान योजना लागू होणार नाही. 

५. अनुदान रक्कम ही आधार संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा होईल (DBI)

६. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यानी कांदा विक्री केलेली विक्री पावती किंवा पट्टी पावती, ७/१२ उतारा, आपले बँक खाते क्रमांक व आपला अर्ज ज्या बाजार समितीकडे कांदा विकला आहे तेथे जमा करावा. 

७. सर्व बाजार समिती याचा प्रस्ताव तयार करून तालुका सहाय्यक निबंधक यांकडे जमा करावे. पुढे जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था यांची मंजूरी मिळाल्या नंतर ती यादी पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे मान्यते साठी देण्यात येणार आहे त्यांनी तपासणी केलेली अंतिम यादी प्रमाणे लाभर्थ्याना अनुदान आयसीआयसीआय या बँके मार्फत मिळेल. कांदा अनुदान ३५० रु. Kanda Anudan 350 Rs.

८. ७/१२ मध्ये पीक पाहणी नोंद असणे आवश्यक आहे. 

९. महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर या शासन निर्णय बाबत माहिती उपलब्ध करून दिलेली आहे.  
 अशाच नवीन महत्वाच्या माहीती साठी फॉलो करा टेलिग्राम चॅनलला 


   
     

Post a Comment

0 Comments