![]() |
Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal Loan Scheme |
Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal Loan Scheme। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना
नमस्कार मित्रांनो, annasaheb patil arthik vikas mahamandal loan scheme। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना ही एक महाराष्ट्र राज्य सरकार ने आर्थिक क्षेत्रात सर्व सामान्य लोकांची प्रगती व्हावी, सक्षम बनावे यासाठी चालू केलेली आहे.
या योजनेचा लाभ शेतकरी, आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि इतर मागास वर्गीय यांना घेता येणार आहे. चला तर मग या विषयी संपूर्ण माहिती बघूया, लेख आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की शेयर करा.
या योजनेत 3 प्रकारचे कर्ज व्याज परतावा मिळवता येतात.
👉वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना.
👉 गट कर्ज व्याज परतावा योजना.
👉 गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना.
या योजनेसाठी सर्व प्रथम व्याज परतावा मिळण्यासाठी छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान या पोर्टल वर रजिस्ट्रेशन करावे लागते आणि LOI पत्र म्हणजेच हमीपत्र मिळवावे लागते. महामंडळाकडून द.सा.द.शे. 12% या व्याजदाराने किंवा जास्तीत जास्त 3 लाख व्याज परतावा देण्यात येईल त्यासाठी कर्ज कालावधी 5 वर्ष असायला हवे.
अशाच नवीन महत्वाच्या माहीती साठी फॉलो करा
👇
👉अर्ज करण्यासाठी लाभार्थी पात्रता काय आहे ?
1. लाभार्थी हा महाराष्ट्र या राज्याचा रहिवासी असावा.
2. महिलांसाठी 55 वय वर्ष आणि पुरुष 50 वय वर्ष यात अट दिलेली आहे
3. या योजनेसाठी 8 लाखांच्या जास्त उत्पन्न नसावे.
4. लाभार्थ्याने महामंडळाशी संबंधित इरत कुठलाही लाभ घेतलेला नसावा.
5. दिव्यांग आणि अपंग यांना संबंधित प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
6. कुटुंबातील एका वेळेस एकालाच याचा लाभ घेता येईल
👉अर्ज करताना लाभार्थी यांना लागणारे कागदपत्रे कोणते आहे ?
1. लाभार्थीचे आधार कार्ड, पॅनकार्ड, रहिवासी पुरावा (रेशनकार्ड).
2. लाभार्थी चे शाळा सोडल्याचा दाखला
3. जात प्रमाणपत्र.
4. तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला
5. ITR असले तर त्याची फाइल ( NIL ITR असला तरी चालेल)
6. प्रकल्प अहवाल (पोर्टल वरती उपलब्ध आहे)
7. बँक कर्ज मंजूरी संमति पत्र
8. उद्यम आधार, बँक कर्ज खाते स्टेटमेंट, व्यवसाय फोटो
9. बँक कर्ज खात्याचा कॅन्सल चेक.
👉बँकेकडून कर्ज प्रकरण मंजूरी साठी लागणारे कागदपत्रे
1. केवायसी कागदपत्रे (लाभार्थी आधारकार्ड, पॅनकार्ड, रहिवासी पुरावा)
2. व्यवसाय करत असलेल्या जागेचे कागदपत्र
3. ITR असले तर त्याची फाइल ( zero ITR असला तरी चालेल)
4. लभार्थीचा CIBIL credit अहवाल
5. प्रकल्प अहवाल (फॉरमॅट पोर्टल वर उपलब्ध आहे).
👉अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे?
1. लाभार्थीने udyog.mahaswayam.gov.in या साइट वर क्लिक करून आपली नोंदणी करावी.
2. नोंदणी झाल्या नंतर LOI साठी अर्ज करावयाचा आहे त्यासाठी वैयक्तिक कर्ज योजना यावर क्लिक करा.
3. अर्ज करण्यासाठी या पर्यायावर क्लिक करा त्यासाठी खाली दिलेल्या इमेज चा आधार घेऊ शकता पुढे आपला जिल्हा निवड करा आणि लागू करा यावर क्लिक करा आपल्याला उत्पन्न मर्यादेचा एक नोटिफिकेशन येईल त्यात होय वर क्लिक करा.
4. पुढे तुमची वैयक्तिक माहितीचा तपशील भरावा, निवासी माहिती तसेच पुढे दिलेली सर्व माहिती भरून घ्यावी आणि अर्ज जतन करा यावर क्लिक करावे.
5. त्यानंतर कर्ज तपशील हा पर्याय दिसेल त्यात व्यवसाय माहिती द्यायची आहे, पत्ता आणि व्यवसायाचे स्वरूप काय आहे ती माहिती भरायची आहे, कर्ज रक्कम बँकेकडून किती हवी आहे ती भरावी आणि त्यानंतर अर्ज जतन करा यावर क्लिक करावे.
6. आता लाभार्थी ला कागदपत्र अपलोड करायची आहे त्यासाठी पुढे अपलोड यावर क्लिक करा आणि रहीवसी पुरावा (रेशनकार्ड, बँक पासबूक, लाइटबिल), आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला किंवा ITR असेल तर त्याची फाइल अपलोड करा, जातीचा दाखल किंवा शाळा सोडल्याचा दाखला आणि प्रकल्प अहवाल अपलोड करायचा आहे आणि अर्ज जतन करावा.
7. पुढे मुख्य मेनू मध्ये जाऊन अर्ज क्रमांक यावर क्लिक करून आपली संपूर्ण महिती तपासून घ्या आणि पुन्हा अपलोड या बटणावर क्लिक करून शेवटी सबमिट या बटणावर क्लिक करा.
8. मुख्य मेनू मध्ये आपला अर्ज दाखवला असेल त्याची स्थिति मेनू मध्ये दिसेल. pending असे दिसेल त्यानंतर 7-15 दिवसांमध्ये लभार्थीचा LOI या पोर्टल वर मिळतो.
टीप - सर्व प्रकरण मंजूर झाल्यानंतर क्लेम करायला विसरू नये त्याशिवाय कर्ज परतावा मिळणार नाही.
अशाच नवीन महत्वाच्या माहीती साठी फॉलो करा
0 Comments
Helpful Information