Translate

सीटीईटी २०२३_CTET 2023

               

सीटीईटी २०२३_CTET 2023
सीटीईटी २०२३_CTET 2023

 सीटीईटी२०२३_CTET 2023

                        नमस्कार मित्रांनो,  सीटीईटी २०२३_CTET 2023 म्हणजेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहे तरी पात्र शिक्षक यांनी लवकर अर्ज करावा. शिक्षक भरती साठी या पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आता नवीन भरती शिक्षकांना अनिवार्य आहे. 

                       मित्रांनो या लेख मधून आपण या परीक्षेसाठी अर्ज कसा करावा याबद्दल जाणून घेणार आहोत  लेख आवडल्यास नक्की आपल्या मित्रांना शेयर करा. 


अशाच नवीन महत्वाच्या माहीती साठी फॉलो करा

                           
                                   Telegram


👉अर्ज कुठे करावा ?

Central Teacher Eligibility Test_केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा या साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून अर्ज करावा. 

 👇

CTET EXAM 2023


👉परीक्षेचे स्वरूप कसे आहे ?

सीटीईटी ही परीक्षा जुलै २०२३ ते ऑगस्ट २०२३ या काळवधीत होणार आहे तसेच ही परीक्षा CBT म्हणजेच कॉम्प्युटर बेस घेतली जाणार आहे यासाठी वेळ २.३० तास असा दिलेला आहे. परीक्षेची दिनांक ही अॅडमिट कार्ड वर दिलेली असणार आहे.  


👉अर्ज करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यावा?

अर्ज करताना jpg या फॉरमॅट मध्ये स्कॅन केलेला अर्जदारचा फोटो हवा, फोटो हा नवीन असावा, फोटो साइज मध्ये ३.५ सेमी. रुंदी आणि ४.५ सेमी. ऊंची हवी. फोटो हा १० केबी . ते १०० केबी . मध्ये असायला हवा. 

अर्जदार याची सही jpg या फॉरमॅट मध्ये स्कॅन करावी आणि सही ही ३ केबी . ते १० केबी . मध्ये असावी तसेच ३.५ सेमी. लांबी व १.५ सेमी. ऊंची असावी. 


👉परीक्षा फी किती आणि कशी भरावी?

या परीक्षेसाठी, 👉जनरल आणि ओबसी या कॅटेगरीला पेपर १ किंवा २ साठी  - १००० रु., पेपर १ आणि २ साठी १२०० रु. आहे. 

👉 एससी आणि एसटी/अपंगांसाठी पेपर १ किंवा २ साठी  - ५०० रु., पेपर १ आणि २ साठी ६०० रु. आहे. 

परीक्षा फी भरणा करण्यासाठी डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगचा वापर करू शकतात. 

टीप -  अर्ज केल्या नंतर फी भरणा करण्या आधी सर्व अर्ज नीट तपासून घेणे फी भरणा झाल्या नंतर कोणतेही दुरुस्ती होणार नाही.  काही कारणास्तव फी भरताना काही error आला असेल तर कृपया पुन्हा फी भरावी आधी केलेल पेमेन्ट हे रिफंड केले जाईल. 


👉अर्ज  कसा करावा ?

  • या लेखातील वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर Apply for CTET July 2023 या वर क्लिक करा. 
  • New Registration हा पर्याय दिसेल यावर क्लिक करा पुढे तुम्हाला सर्व सूचना आणि नियम दिलेले आहे ते सर्व वाचून मग चेक बॉक्स मध्ये क्लिक करून click to proceed यावर क्लिक करा. 
  • पुढे वयक्तिक माहिती आणि पत्ता यांची माहिती भरावी. (आधार कार्ड वरील संपूर्ण नाव यामध्ये भरावे),संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी. 
  • अर्जदार यांचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी काळजीपूर्वक टाकावी. यावर application no. पाठवला जाईल जो पुढे आपला फॉर्म लॉगिन करण्यासाठी लागेल. 
  • त्यानंतर आपला पासवर्ड तयार करावा आणि सुरक्षा प्रश्न दिलेला आहे त्यातला हवा तो निवडा आणि त्याचे उत्तर लक्षात ठेवा, तसेच पुढे पिन दिलेला आहे तो भरा आणि सबमिट करा. 
  •  आता तुम्हाला एक अॅप्लिकेशन नंबर मिळेल तो आणि सेट केलेला पासवर्ड वापरुन आपला अर्ज लॉगिन करून घ्या. त्यानंतर अॅप्लिकेशन फॉर्म पूर्ण करायचे आहे. 
  • अर्जदाराचे संपर्क माहिती, पत्ता, जन्मदिनांक, जात प्रवर्ग ही सर्व माहिती टाकावी तसेच आधीची काही माहिती अपडेट झाली असेल तर ती तपासून घ्यावी. 
  •  अर्जदाराने त्यानंतर आपला पेपर 1 ते 5 किंवा पेपर 6 ते 10 , पेपर 1 आणि 2 यापैकी एक पर्याय निवड करावी. पुढे आपली भाषा निवडा, आपले शैक्षणिक माहिती भरा, पुढे एक विषय निवड करायची आहे. त्यानंतर D.Edu.किंवा B.Edu. हे निवडा आणि सर्व माहिती भरा नंतर सुरक्षा पिन टाकून माहिती सबमिट करा. 
  • पुढे वर सांगितल्या प्रमाणे फोटो आणि सही उपलोड करावी. त्यानंतर परीक्षा केंद्र याची निवड करावी आणि पूर्ण अर्ज तपासून final सबमिट करावा. 

         अशाच नवीन महत्वाच्या माहीती साठी फॉलो करा

 
                                   Telegram  



 




Post a Comment

0 Comments